सुट्टीवर आलेल्या सैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू !

1095

मोटार सायकलचा झाला होता अपघात;
सोनेवाडीत होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

संजय निकाळजे..
BNU न्यूज नेटवर्क.
चिखली (24 Jan.2023) पंजाबमध्ये सैन्य दलात कार्यरत असलेल्या सैनिकाचा गावी सुट्टीवर आल्यावर मोटर सायकलचा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम बुलढाणा व त्यानंतर पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मंगळवार २४ जानेवारी रोजी सकाळी मृत्यू झाला. त्याचे पार्थिव बुधवार २५ जानेवारी रोजी त्याच्या मुळ गावी सोनेवाडी येथे आणून तेथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथील सैनिक रवींद्र पांडुरंग राखोंडे (वय २६ ) हे नांदेड येथे सण २०१६ मध्ये भरती झाले होते. सध्या ते पंजाब येथे आपले कर्तव्य बजावत होते. १ जानेवारीला तो घरी सोनेवाडी येथे सुट्टीवर आले होते. १२ जानेवारी रोजी त्यांचा पिंपळगाव सराईजवळ मोटरसायकलवर अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्याला प्रथम बुलढाणा येथे उपचारासाठी नेण्यात आले. व त्यानंतर १५ जानेवारी रोजी मिलिटरी हॉस्पिटल पुणे येथे उपचारासाठी दाखल केले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज मंगळवार २४ जानेवारी रोजी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचे पार्थिव बुधवार २५ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत त्यांचे गाव सोनेवाडी येथे आल्यानंतर त्याच्यावर शासकीय विमानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सैनिक रवींद्र राखोडे यांच्या पश्चात वडील, ४ बहिणी, पत्नी किरण व १ वर्षाचा मुलगा आहे. अशी माहिती सोनेवाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष विलास तायडे यांनी ‘बुलडाणा न्यूज अपडेटचे’ प्रतिनिधी संजय निकाळजे यांच्याशी बोलतांना दिली. रविंद्र राखोंडे हे आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.