अंत्री येथे टायफाईडचे थैमान; 10 मुलांवर बुलढाणा येथे उपचार सुरु

214

पाण्याचा अहवाल निल; मग टायफाईडची लागण झाली कशी?

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (Date.22 Jan.2023) मोताळा शहरापासून 2 कि.मी.अंतरावर असलेल्या अंत्री येथे टायफाईडच्या आजाराने थैमान घातल्याची माहिती समोर आली आहे. 18 मुलांची प्रकृती चांगली असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथून सुट्टी देण्यात आली आहे. तर 8 चिमुकल्यांवर जिल्हा रुग्णालयात व 2 मुलांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच काही नागरिकांना सुध्दा टायफाईडची लागण झाली असून त्यांच्यावर सुध्दा बुलढाणा येथे उपचार सुरु असल्याची माहिती आहे, परंतु त्यांचे नावे मात्र कळू शकली नाही. येथील पाण्याचा अहवाल निल असून टायफाईडची लागण कशी झाली, असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित केल्या जात आहे.

अंत्री येथील पाण्याची स्त्रोत्राचा रिपोर्ट नील आल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे, परंतु सदर अहवाल नागरिक पित असलेल्या पाण्याचा नसल्याचा दावा काही मुलांच्या पालकांनी ‘बुलढाणा न्यूज अपडेट’शी बोलतांना केला आहे. गावात तापाची साथ सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाला मिळताच अंत्री येथे 18 जानेवारी रोजी गावात कॅम्पचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. परंतु तापाने लहान मुले मोठे माणसे फणफणत असल्याने त्यांच्यावर मोताळा येथे प्राथमिक तर जिल्हा सामान्य रुग्णालय व बुलढाणा येथील खाजगी रुग्णालयात मुलांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन बुलढाणा यांच्यावतीने देण्यात आलेल्या माहिती नुसार आनंद बुंदे, गणेश सुरडकर, सोहम बुंदे, रोहन सुरडकर, पृथ्वीराज कोळसे, आदीत्य बुंदे, सोनल बुंदे, वैष्णवी सुरडकर, रंजीत बुंदे, अर्चना हरमकार, आनंदी कोळसे, आराध्या कोळसे, आरती सुरडकर, निलीमा फुंड, प्रसाद सुरडकर, श्रध्दा नरवाडे,पुजा काकफळे, कृष्णा बुंदे यांना टायफाईडची लागण झाली होती. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर रविंद सुरडकर, पुजा सुरडकर,गौरव सुरडकर, आयुष सुरडकर, सान्वी कोळसे, दिव्या खोंड, सार्थक बहादरे, वीर वाडे या लहान मुलांवर जिल्हा रुग्णालयात तर दोन लहान मुलांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अंत्री गावात तापाची साथ सुरु असल्याची माहिती मिळताच तालुका आरोग्य प्रशासनाने कॅम्पचे आयोजन करुन तपासणी करण्यात आली. येथील पाण्याचा अहवाल निल असून आशा वर्कर सर्व्हे करीत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रविंद्र पुरी यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली.