1)अॅड.बाळासाहेब आंबेडकर करणार मेळाव्याला मार्गदर्शन
2)आदिवासी मेळाव्याला हजारोच्या संख्येने उपस्थित रहा- निलेश जाधव
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (11 Mar.2023) वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारीणीची बैठक विश्रामगृह बुलढाणा येथे आज 11 मार्च रोजी आयोजीत करण्यात आली होती. यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी बैठकीमध्ये तालुका व शहर कार्यकारणी यांना दिलेल्या कामांचा आढावा घेऊन, महीला कार्यकारणीसाठी नियोजीत दौरा व जिल्ह्यातील सार्वजनिक विविध समस्या घेऊन 27 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार याबाबत नियोजन करुन भुमीका स्पष्ट केली.
संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी येथे १५ मार्चला आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच या मेळाव्याला महाराष्ट्राचे नेते अशोक सोनोने, राज्यउपाध्यक्ष प्रा.धैर्यवर्धन पुंडकर,जिल्हा प्रभारी प्रदिप वानखेडे यांच्या व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आलेवाडी तालुका संग्रामपुर येथे आदिवासी आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तमाम आदिवासी बांधवानी या मेळाव्याला उपस्थीत रहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी केले. या बैठकीला जिल्हायुवा अध्यक्ष सतिष पवार व महीला जिल्हाध्यक्ष अलकाताई जायभाये व जिल्हाउपाध्यक्ष भिमराव शिरसाठ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीला बाला राउत जिल्हा संघटक,अॅड.अमर इंगळे विधी सल्लागार,आत्माराम चौरे,मनोज खरात,मिलींद वानखेडे,दिलीप राजभोज,समाधान डोंगरे,विशाल गवई युवा महासचिव बुलडाणा,आकाश गवई युवा महासचिव,मधुकर शिंदे,विजय राउत,रामप्रसाद जायभाये,संजय धुरंधर,राहुल जाधव,भगवान दांडगे,ऊमेश वानखेडे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.