बेलाडच्या ‘चित्रंग’ला शेलापूर येथे मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

7

मोताळा: आमच्याविरुध्द पोलिसात फिर्याद का दिली. या कारणावरुन चौघांनी बेलाडच्या चित्रंगला मोताळा ते शेलापूर रोडवर 8 जुलैला दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास लोखंडी आसारीने मारहाण केली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील विजय हरीभाऊ चित्रंग हे शेलापूर ते मोताळा जाणारा रोड शेलापूर शिवारात गोपाल तुकाराम संबारे व प्रसाद गोपाल संबारे रा.बेलाड यांनी तू आमच्या विरुध्द पोस्टे.ला फिर्याद का दिली, या कारणावरुन लोखंडी पाईपने पायावर मारहाण केली. तर वाघजाळ येथील मोहन पंडीत याने लोखंडी आसारीने व गणेश सोनवने रा.बेलाड याने लाकडी काठी व दगडाने दोन्ही पायावर व पाठीवर मारहाण करीत चौघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या विजय चित्रंग यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त चौघांवर भादंवीचे कलम 118 (1) 115, 352, 351(2), 351 (3), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहे.