23 वर्षीय विवाहितेची माहेरी आत्महत्या

457

मोताळा तालुक्यातील सारोळा पीर येथील घटना

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा(8 Apr.2023) तालुक्यातील सारोळा पीर येथे माहेरी आलेल्या एका 23 वर्षीय विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज 8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. मृतक विवाहितेचे नाव सौ.सविता सोनोने असे आहे.

प्राप्त माहितीनुसार धा.बढे पोस्टे.अंतर्गत असलेल्या सारोळा पीर ता.मोताळा येथे माहेरी आलेल्या सौ.सविता संतोष सोनोने (वय 23) या विवाहितेने आज शनिवार 8 एप्रिल रोजी आई-वडिल शेतीमध्ये गेलेले असतांना सकाळी 11 वाजेच्या सुमारास सविताने घरातील लोखंडी अ‍ॅगलला दोरखंडाने फासी घेवून आत्महत्या केली, अश्या सुनिल वखरे यांच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोस्टे.आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक मोहनसिंग राजपूत हे करीत आहेत. सविताचे 3 वर्षापूर्वी येनगाव ता.बोदवड येथील संतोष सोनोने यांच्यासोबत लग्न झाले होते. तीला एक चिमुकला बाळ आहे.आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.