चोरट्याने शेंबा येथील शेतकऱ्याची 40 हजाराची गायच नेली चोरुन!

187

मोताळा(BNUन्यूज) मोताळा तालुक्यात लम्पीचे मोठे थैमान सुरु असून जवळपास 70 जनावरांचा लम्पीने मृत्यू झाला आहे. असे असतांना  चोरट्याने शेंबा बु. ता.नांदूरा येथील एका शेतकऱ्याची 40 हजाराची गायच चोरुन नेल्याची घटना 11 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. याबाबत शेतकऱ्याच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेंबा बु.येथील शेतकरी सुरेंद्र मधुकर चौधरी यांच्याकडे 4 वासऱ्या व 1 गाय असे पशुधन आहे. ते ढोरांना घराच्या बाजूला असलेल्या वाड्यामध्ये बांधतात. नेहमीप्रमाणे ते 10 ऑक्टोबरच्या रात्री जनावरांना चारापणी करुन घरी झोपले. 11 ऑक्टोबरच्या सकाळी 6 वाजेच्या सुमारास गाय व वासरे या जनावरांना चारापणी करण्यासाठी गेले असता त्यांना 4 वासरे वाडयात दिसले परंतु गाय दिसली नाही. खुटयाला बांधलेली दोरी कापलेली आढळून आल्याने त्यानी आजुबाजुला, रानामध्ये शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. गाय अंदाजे पाच वर्ष वयाची असून तिचा रंग लाल व गोल शिंगे, बांधा उचवट गाय वाड्यातून 10 ते 11 ऑक्टोबरच्या रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्याच्या सुरेंद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द बोराखेडी पोस्टे.ला अप क्र.0437/22 अन्वये भादंवीचे कलम 379 अन्वये अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोकाँ.सुपडसिंग चव्हाण हे करीतआहे. (फोटो-संग्रहीत)