मुंबईत काहीतरी शिजले; काँग्रेसला बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हवा ?

987

प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील नेत्यांनी मांडली बाजू !

बुलढाणा (3.JUNE.2023) राजकारणात कधी कुणाचे वैर नसते, अन् असूही नये , असे म्हटले जाते..! आज इधर, कल उधर, परसो फीर दिल लाया हूँ! अशी काहीशी राजकीय नेत्यांची ओळख झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सन 2024 च्या लोकसभा निवडणूकीचे कॅम्पेन सुरु झाले असून बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसला देण्यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांची 2 जून रोजी मुंबई टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत, बुलढाणा लोकसभेचा उमेदवार कोण असेल, यावरचे मत जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते, यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी जिल्ह्याचा सविस्तर अहवाल सादर करुन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा यावेळी काँग्रेस पक्षाला हा लोकसभा मतदार सोडून घेण्यात यावा, आम्ही आमचा एक तगडा उमेदवार देवू, त्यासाठी आमचे नेते मुकुलजी वासनीक यांचे मत जाणून घेण्यात यावे. त्यांना जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास असल्याचे बोंद्रे म्हणाले. तर बुलडाणा जिल्हा प्रभारी नानाभाऊ गावंडे यांनी बुलढाणा व विदर्भातील परिस्थितीवर प्रखरपणे मत मांडत जिल्ह्यातील पक्षाचा उमेदवार कोण? यावर चर्चा होवून 4 ते 5 नावे समोर आली. यावेळी आमदार धीरज लिंगडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ , शामभाऊ उमाळकर, लक्ष्मणराव घुमरे, दिलीपराव जाधव यांनी आपापले मते मांडले. या बैठकीला प्रदेश पक्ष निरीक्षक दिलीपराव भोजराज , Adv.जयश्रीताई शेळके, डॉ अरविंद कोलते, दादू शेठ, रामविजय बुरूंगले, धनंजय देशमुख , सौ.स्वातीताई वाकीकर, अनंतराव वानखेडे, Adv.हरीश रावळ , गौतम गवई, सतीश मेहेंद्रे, मनोज कायंदे, सुनील सपकाळ, Adv.गणेशसिंग राजपूत, प्रमोद दादा अवसरमोल , शैलेश खेडकर, प्रा खर्चे, मा मोईन काझी, एकनाथ चव्हाण इ उपस्थित होते. आता मुकुल वासनिक काय मत मांडतात, त्यावर बुलढाणा काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार कोण असू शकतो, अन् ही जागा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व उबाठा. शिवसेना यांचेशी चर्चा करुन ठरविली जाईल का? असे अनेक प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत आहे. शेवटी सर्व जिल्हावासीयांना एकच प्रश्न पडतो, बुलढाणा लोकसभेचे टिकीट काँग्रेसच्या वाट्याला जाईला का?