महाराष्ट्रात दरदिवसाला होत आहेत 101 मुली व महिला बेपत्ता ! त्या आहेत तरी कुठे ?

783

भयावह आकडेवारी ;13 दिवसात 1315 मुली बेपत्ता!

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (13.May.2023) राज्यामध्ये महिला व तरुण मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठ्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात दर दिवशी जळपास 101 मुली राज्यातून बेपत्ता होत आहे, त्या कुठे जातात, पुढे त्यांचे काय होते. याची आकडेवारी समोर येणे गरजेचे आहे. ‘Buldana News Update’  ला मिळालेल्या माहितीनुसार 1 ते 13 मे या तेरा दिवसाच्या कालावधीमध्ये जवळपास 1315 महिला व मुली बेपत्ता झाल्याची भयावह आकडेवारी समोर आली असून त्याचे दरदिवसाचे प्रमाण 101 असे आहे. महिला व तरुणी बेपत्ता होण्यामागे ‘सेक्स रॅकेट’ किेवा ‘लव्ह जिहाद’ तर सक्रीय नाही ना, असा प्रश्न सुज्ज्ञ नागरिक विचारीत असून ही आकडेवारी कदाचीत अशीच राहिली तर महाराष्ट्र एक दिवस ‘केरळ’ बनायला उशीर लागणार नाही, एवढे मात्र निश्चीत !

तीनवर्षापुर्वी अधिवेशनामध्ये बेपत्ता झालेले मुलींचे काय असा प्रश्न सुध्दा उपस्थित करण्यात आला होता. परंतु काळ गेला वेळ गेला आता कोणालाही काहीही घेणेदेणे नाही, अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस अधिक्षकांनी पोलिसांना बेपत्ता महिला व मुलींचे अहवाल सादर करण्याचे आदेश सुध्दा दिले होते. यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये महिला व पुरुष पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुध्दा करण्यात आल्या होत्या. एकीकडे शासन महिलावरील अन्याय, अत्याचार कमी करण्यासाठी विविध योजना राबवित असून त्यासाठी शेकडो शासन निर्णय सुध्दा काढले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणीच होत नाही.

राज्यात दररोज शेकडो, हजारो तरुण मुली व महिला बेपत्ता होत आहे. पुढे त्यांचे काय झाले? त्या सध्या कुठे आहेत? त्या सुरक्षित आहे की, त्यांना दलालांनी वेश्या व्यवसायाकडे वळविले काय, की त्या लव्ह जिहादला बळी पडल्यात काय ? याचे खर कारण बाहेर येणे अपेक्षीत असतांना याबद्दल कोणीही राज्याचे गृहविभागाला जाब विचारला नाही, की गृहविभागाने बेपत्ता महिला व मुली सध्या कुठे आहेत याचा आकडा जाहीर न केल्याने त्या महिलांचे काय झाले, त्या कुठे गेल्या असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

जिल्हानिहाय बेपत्ता झालेल्या मुलींची आकडेवारी

राज्यात 1 ते 13 मे दरम्यान 1315 मुली व महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्याचे प्रमाण पाहीले असता, दर दिवसाला 101 मुली बेपत्ता होत आहे. अहमदनगर जिल्ह्यतून 53, अकोला 8, अमरावती 38, औरंगाबाद 56, बीड 25, भंडारा 10, ब्रुहनमुंबई 127, बुलढाणा 23, चंद्रपूर 19, धुळे 14, गडचिरोली 11, गोंदीया 10, हिंगोली 4, जळगाव 44, जालना 20, कोल्हापूर 65, लातूर 18, मिरा भाईंदर मुंबई 39, नागपूर 77, नांदेड 27, नंदूरबार 5, नाशिक 89, नवी मुंबई 27, उस्मानाबाद 17, पालघर 11, परभणी 11, पिंपरी चिंचवड 61, पुणे सिटी 59, पुणे ग्रामीण 48, रायगड 11, रेल्वे पुणे 2, रत्नागिरी 6, सांगली 42, सातारा 49, सिंधदुर्ग 8, सोलापूर जिल्हा 60, ठाणे जिल्हा 69, वर्धा जिल्हा 14, वाशिम 15 तर यवतमाळ जिल्ह्यात 33 अश्या एकूण 1315 महिला व मुली 13 दिवसात बेपत्ता झाल्या आहेत. यातील किती परत आल्या, कितींनी लग्न केले, किती मुलींचा शोध लागला, किती बेपत्ताच आहेत. याची आकडेवारी मात्र मिळू शकली नाही.(ही आकडेवारी 3 आज 3 वाजेपर्यंतची आहे)