अंत्री येथे शेतकऱ्याची आत्महत्या

39

मोताळा- सततची नापीकी व कर्जबाजारीला कंटाळून अंत्री येथील एका सत्तरवर्षीय शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार 19 मार्च रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतक शेतकऱ्याचे नाव वसंता भिकु जवरे असे आहे.

तालुक्यातील अंत्री येथील शेतकरी वसंता भिकु जवरे यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे. मागील दोन वर्षापासून सततची नापिकी, यामुळे शेतीला लावलेला खर्च सुध्दा निघाला नसल्यामुळे बँकेचे कर्ज व खाजगी कर्ज कसे फेडावे ? या विवंचनेत वसंता जवरे यांनी 19 मार्च रोजी गुरांच्या गोठ्यात टिनाच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्यांच्यावर जिल्हा केंद्रीय बँकेचे एका लाखाचे कर्ज होते. संतोष जवरे यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या पश्चात भाऊ वासुदेव जवरे, पुतणे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.