बुलढाणा स्थागुशाने मोताळा तालुक्यात दुचाकी चोरट्यांचे रॅकेट पकडले; 4 चोरट्यांकडून 8 चोरींच्या दुचाकीसह पाच लाखाचा मुद्देमाल जप्त !

56

BNU न्यूज नेटवर्क
मोताळा (20 Sep.2023 ) बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखा पथकाने मोताळा गोपनीय माहितीच्या आधारे तांत्रीक बाबी तपासत मोताळा तालुक्यातील नेहरु नगर येथे मोठी धडाकेबाज कारवाई करीत विविध पोलिस स्टेशनला दाखल 7 गुन्ह्यातील 4 आरोपींच्या मुसक्या आवळीत त्यांच्याकडून 4 लक्ष 80 हजाराच्या 8 चोरीच्या मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. सदर कारवाई आज 20 सप्टेंबर रोजी करण्यात आली असून उर्वरीत चोरट्यांना पकडण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे.

जिल्ह्यात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच पोलिसांच्या नेटवर्क पेक्षा चोरट्यांचे नेटवर्क व खबरी पावरफुल्ल असल्याने दुचाकी चोरट्यांना पकडणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. स्थागुशा पथकाने अ‍ॅक्शन मोडवर येत, जिल्ह्यात विविध पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी मोताळा तालुक्यात दुचाकीची विक्री करणार असल्याची गोपनीय माहितीवरुन स्थानिक गुन्हा शाखा पथकाने तांत्रीक बाबी तपासत दुचाकीला लावलेल्या जीपीएस ट्रॅकींगच्या सहाय्याने 4 चोरट्यांना आज बुधवार 20 सप्टेंबर रोजी मोताळा तालुक्यातील नेहरु नगर येथे मेहकर पोस्टे. साखरखेर्डा, किनगाव राजा, सिंदखेड राजा,देऊळगाव राजा, अंढेरा पोस्टे.ला दाखल असलेल्या 6 मोटार सायकल व जबरी चोरी 1 अश्या 7 गुन्ह्यातील अरुण रघुनाथ शिंदे (वय-25) व समाधान घेवंदे (वय-27) दोन्ही रा.पळसकर चक्का ता.सिं.राजा, विजय देवकर (वय-24) रा नेहरुनगर ता.मोताळा, सचिन काळुसे रा.जगदरी ता.सिंदखेड राजा या आरोपींना पकडून त्यांच्याकडून 4 लक्ष 80 हजार रुपये किमतींच्या 8 मोटार सायकली जप्त केल्या. सदर कारवाई स्थागुशा.पथकाचे पीएसआय.श्रीकांत जिंदमवार, हेकाँ.दिपक लेकुरवाळे, एनपीसी.पुरुषोत्तम आघाव, पोकाँ.अमोल शेजोळ, पोकाँ.गजानन गोरले, पोकाँ.गणेश शेळके, एलपीसी.वनिता शिंगणे, चालक एनपीसी. सुरेश भिसे यांच्या पथकाने जिल्हा पोलिस अधिक्षक सुनिल कडासणे, अप्पर पोलिस अधिक्षक बी.बी.महामुनी, अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

जीपीएस ट्रॅकींगवरुन गुन्ह्याचा छडा..

स्थानिक गुन्हा शाखेला चोरींच्या दुचाकीची मोताळा तालुक्यात विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. स्थागुशा पथक मोताळ्यात दाखल होवून त्यांनी दुचाकीला लावलेल्या जीपीएस ट्रॅकींगच्या सहाय्याने दुचाकीचे लोकेशन ट्रेस करीत तालुक्यातील नेहरु नगर येथून 4 आरोपींच्या मुसक्या आवळीत त्यांच्याकडून 4 लक्ष 80 हजाराच्या 8 मोटार सायकली जप्त केल्या आहेत. उर्वरीत आरोपीना पकडण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे.