‘फ्रिज’ ने साधला डाव; दोन महिलांचे उडविले 19 हजाराचे दागीणे

48

श्रीक्षेत्र थळ येथील घटना;प्रगटदिनीनिमित्त आल्या होत्या दर्शनाला

मोताळा: तालुक्यातील श्रीक्षेत्र गजानन महाराज मंदीर थळ येथे दर्शनासाठी आलेल्या दोन महिलांचे दागीण्यावर ‘फ्रिज’ने डाव साधत त्यांचे 19 हजार 500 रुपयांचे दागीणे लंपास केल्याची घटना गजानन महाराज परिसरात घडली. महिलेच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोलिसांनी संशयीत ‘फ्रिज काळे’ याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

शेवगा ता.जामनेर जि.जळगाव खांदेश येथील युमनाबाई करतार राठोड व पठाड ता.जामनेर येथील प्रिती महेश चव्हाण ह्या श्रींचा प्रगटदिनानिमीत्त 3 मार्च रोजी श्रीक्षेत्र थळ येथे दर्शनासाठी आल्या होत्या. चोरट्याने आपले नेटवर्क सक्रीय करीत आपले मिशन फत्ते करीत गर्दीचा फायदा घेत संशयीत ‘फ्रिज’ने युमनाबाईच्या गळ्यातील डोरले अडीच ग्रॅम 7 हजार 500 रुपये व प्रिती चव्हाण यांच्या गळ्यातील सोन्याचे आठ मणी व दोन डोरले 12 हजार रुपये असा एकूण 19 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची यमुना राठोड यांच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोलिसांनी फ्रिज सुनिल काळे रा.वाघापूर अंत्री ता.चिखली याच्यावर भादंवीचे कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.