मोताळ्यात 35 वर्षीय युवकाची आत्महत्या

36

मोताळा: शहरातील प्रभाग क्र.10 मध्ये एका 35वर्षीय युवकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सोमवार 1 एप्रिल रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतक युवकाचे नाव मंगेश गाडेकर असे आहे.

तालुक्यातील चिंचपूर येथील रहिवासी असलेल्या व सध्या मोताळा येथे राहणाऱ्या मंगेश बारसु गाडेकर (वय 35) या युवकाने शेख सुलतान शेख नजीर प्रभाग क्र.10 यांच्या किचन रुममध्ये टीनपत्राच्या खाली असलेल्या लोखंडी पाईपाचे आड्याला वायरच्या सहाय्याने गळफास घेतला. सदर घटना 1 एप्रिल रोजी सकाळी 5.29 वाजता उघडकीस आली. शेख सुलतान शेख नजीर यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. सदर तरुणाने आत्महत्या का केली, याचे कारण मात्र समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहे.