सामाजिक कार्यकर्ते अजय गायकवाड यांची सामाजिक बांधिलकी.. गिरडा येथे २५० जनावरांवर केले मोफत लम्पी लसीकरण

663

बुलढाणा(BNUन्यूज) ‘लम्पी स्कीनच्या’ पार्श्वभूमीवर बुलडाणा तालुक्यातील गिरडा येथे २५० जनावरांचे सामाजिक कार्यकर्ते अजय गायकवाड यांनी १६ सप्टेंबर रोजी स्वखर्चातून मोफत लसीकरण करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

लम्पी आजारावर लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभाग सरसावला आहे. मात्र अजय गायकवाड यांनी सरकारी लसीकरण कॅम्पची वाट न पाहता आपल्या गावातील जनावरांचे मोफत लसीकरण करून पशुपालकांनी जनावरांची काळजी कशी घ्यायची, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. लम्पी स्कीन आजाराची जनावरात लक्षणे दिसून येताच पशुपालकाने तातडीने नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अजय गायकवाड केले आहे. यावेळी सरपंच भारत भिसे, मनीष गायकवाड , संदीप गायकवाड, शिवशंकर गायकवाड, महेंद्र कड, संदीप गाडेकर, सतिश भिसे, तुलेंद्र गायकवाड, रामू सस्ते ,अमोल गायकवाड, सुनील गायकवाड, मदन टेलर, अमोल शेळके, कडूबा पाटील, विलास चव्हाण, महेश तळेकर, अक्षय गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, नितीन चांदडकर, मदन बारोटे, दीपक जाधव यांच्यासह गावातील पशुपालकांची उपस्थिती होती.