कल्याणी पाटील यांचा सुवर्णपदक देवून सन्मान

267

राम हिंगे
केळवद(BNU न्यूज) – महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय येथील विद्यार्थिनी सौ.कल्याणी श्रीकृष्ण पाटील यांना नुकतेच पदवी वितरण समारंभात सुवर्णपदक देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

कल्याणी पाटील ह्या केळवद येथील रहिवासी असून त्यांनी समाज कार्य पारंगत पदवीमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून ८२.२५ टक्के गूण ९ वा क्रमांक पटकाविला आहे. महाविद्यालयात झालेल्या पदवी वितरण सोहळ्यामध्ये नेत्रतज्ज्ञ तथा सामाजिक प्रबोधनकार डॉ. विकास बाहेकर, प्राचार्य एन.ए.गायकवाड यांच्या हस्ते कल्याणी पाटील यांना पदवी प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमास डॉ.हरीश साखरे, प्रा.अर्जुन बोकाडे यांच्यासह समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.