कुंबेफळ येथे शेतीचा वाद विकोपाला गेला.. समाधानने 55 वर्षीय इसमाचा मर्डरच केला !

884

बुलढाणा(BNUन्यूज) बुलढाणा जिल्ह्यात शेतीच्या धुऱ्याच्या वादातून हाणामारी व त्याचे रुपांतर खूनमध्ये झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. बुलढाणा तालुक्यातील कुंबेफळ येथे शेतीच्या वादातून एका 55 वर्षीय इसमाचा मर्डर केल्याची घटना आज 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास बुलढाणा तालुक्यातील कुंबेफळ येथे घडली. मर्डर केल्यानंतर 6 वाजेच्या दरम्यान आरोपी धाड पोस्टे.ला स्वत: हजर झाला.

प्राप्त माहितीनुसार बुलढाणा तालुक्यातील धाड पोस्टे.अंतर्गत असलेल्या कुंबेफळ येथे शेतीच्या वादातून आज 29 ऑक्टोबरच्या सायंकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान कुंबेफळ शिवारात गावाच्या अर्धा कि.मी.अंतरावर गट क्र.27 येथे शेषराव जाधव (वय ५५) यांचा शेतीच्या वादातून आरोपी समाधान पंडित जाधव (वय ३५) याने शेतात धारदार शस्त्राने पोटात वार करून त्यांचा मर्डर केल्याची घटना घडली. आरोपी समाधानने खून केल्यानंतर स्वत: धाड पोस्टे.हजर झाला. वृत्तलिहेपर्यंत धाड पोस्टे.ला घटनेची कोणतीही नोंद नव्हती. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएआय.केंद्रे हे करीत आहे.