धा.बढे येथे 20 वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

364

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (9 ‍Feb.2023) तालुक्यातील धा.बढे येथे आत्महत्येचे सत्र सुरु असून आठवड्याभरात तीन जणांनी आत्महत्या केल्याने गावामध्ये खळबळ उडाली आहे. बुधवार 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास एका 20 वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. युवकाचे नाव दिपक पांडुरंग सुरडकर असे आहे.

धा.बढे येथील वार्ड क्रमांक 4 मधील दिपक सुरडकर (वय 20) याने 8 फेब्रुवारीच्या दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली. सदर घटना तरुणाची आई बाहेरुन आली असता, त्यांना मुलगा घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी हंबरडा फोडीत आरडोओरड करुन शेजारी व नातेवाईकांना बोलाविले. यावेळी नागरिकांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केली. याबाबत मृतक दिपकचे मावसे संजय काकफळे रा.खंडवा यांच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोस्टे.ला मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धा.बढे पोलिस करीत आहे. दिपकने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही.