पानटपरीच्या वादातून शेंबा येथे हाणामारी; चौघांवर गुन्हा दाखल !

925

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा(30.May.2023) भांडण, झगडे व रपारपी केव्हा होईल, हे सांगता येत नाही. अशीच एक घटना बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या शेंबा येथे घडली. कारण होते, पानटपरी लोटून देण्याचे, याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याचा राग मनात ठेवून गोपाल रायपुरे यांना चौघांनी मारहाण केल्याप्रकरणी तांदुळवाडी ता.मोताळा येथील चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर घटना 30 मे रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान घडली.

गोपाल गजानन रायपुरे शेंबा ता.नांदुरा यांनी बोराखेडी पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिड महिन्याअगोदर धनंजय महादेव जुनारे यांनी पानटपरी लोटून दिल्याच्या कारणावरुन वाद झाला होता. त्याबाबतची तक्रार रायपूरे यांनी बोराखेडी पोस्टे.ला दिली होती, त्याचा राग मनात ठेवून धनंजय महादेव जुनारे, युवराज महादेव जुनारे, ज्ञानेश्वर सुरेश जुनारे व गौरव विठ्ठल जुनारे रा.सर्व तांदुळवाडी हे फिर्यादी आज 30 मे रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान त्यांच्या शेंबा येथील पानटपरीजवळ येवून तू माझे नावाचा रिपोर्ट का दिला या कारणावरुन वाद होवून धनंजय जुनारे यांनी रायपूरे यांना शिवीगाळ करीत हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीस जखमी केले, तसेच फिर्यादीचे वडीलांना ज्ञानेश्वर जुनारे यांनी फावड्याच्या दांड्याने मारले, तसेच लहान भावास सुध्दा उपरोक्त चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत पानटपरी येथे कशी काय ठेवतो, पाहून घेईल अशी धमकी दिल्याच्या गोपाल रायपूरे यांच्या फिर्यादीवरुन उपरोक्त आरोंपीवर बोराखेडी पोस्टे.ला भादंवीचे कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहेत.