दारुच्या नशेमध्ये सोयाबीन पेटविली; नंतर त्या इसमाचा मृत्यू झाला !

337

रायपूर पोस्टे.ला मर्ग दाखल; पोस्टमार्टम रिपोर्ट येईपर्यंत सस्पेन्स कायम!

बुलढाणा (BNUन्यूज) बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथे मनाला अचंबीत करणारी एक घटना घडली. घटना तशी साधीसरळ परंतु तेवढीच किचकट सुध्दा वाटते. दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून रायपूर येथील एकनाथ फौलाने यांनी दारुच्या नशेमध्ये आपल्याच ५ एकरातील सोयाबीन पेटवून दिल्याची घटना ३० ऑक्टोबरच्या रात्री त्यांनी कुटुंबीयांना दिली. आणि त्याच रात्री त्या इसमाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली.

रायपूर पोस्टे.अंतर्गत असलेल्या रायपूर येथील ५० वर्षीय एकनाथ फौलाने यांनी दारूचे नशेमध्ये स्वतःच्या शेतातील पाच एकरामधील सोयाबीन सुडी पेटवून दिली. सदर घटनेची माहिती त्यांनी पत्नी, मुले यांना दिली. ३० ऑक्टोबरच्या रात्री सदर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती रायपूर पोलीस स्टेशन ठाणेदार राजवंत आठवले यांना मिळताच त्यांनी मृतक एकनाथ फौलाने यांच्या प्रेताचा पंचनामा करून प्रेत जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. रायपूर पोलीस स्टेशनला या प्रकरणी मृतकाची पत्नी यांच्या फिर्यादीवरुन मर्ग दाखल करण्यात आला आहे. परंतु फौलाने यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे मात्र डॉक्टरांच्या पोस्टमार्टम रिपोर्टवरुन समोर येईल, एवढे मात्र निश्चीत!