मोटार सायकलने बैलगाडीला उडविले; 1 जागीच ठार

61

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (29 Aug.2023) तालुक्यातील मासरुळ तराडखेड रोडवर मोटार सायकलने बैलगाडीला जबर धडक दिल्याने मोटार सायकलवरील मासरुळ येथील एकनाथ गुळवे (वय 42) हे जागीच ठार झाले. तर बैलगाडीवरील सैय्यद तोसिफ हे जखमी झाल्याची घटना आज मंगळवार 29 ऑगस्टच्या सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली.

एकनाथ नारायण गुळवे हे आपल्या दुचाकी क्र.एम.एच.28 बी.एन.8399 ने मासरुळकडे जात असतांना सैय्यद हुसेन व त्यांचा मुलगा सैय्यद तोसिफ हुसेन रा.तराडखेड हे दोघे मासरुळकडून तराडखेडकडे बैलगाडीने जात होते. दरम्यान आज 29 ऑगस्ट सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास तराडखेड शिवारात मोटार सायकलने बैलगाडीला जोरदार धडक बसली. या धडकेत एकनाथ गुळवे हे जागीच ठार झाले. तर बैलगाडीतील सैय्यद तोसिफ हे जखमी झाले. घटनेची माहिती शेषराव सावळे यांनी धाड पोलिसांना देताच ठाणेदार मनिष गावंडे व बीट जमादार सोनुने, चौधरी, पोकाँ.खमाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करुन मृतदेह तपासणीसाठी धाड येथे पाठविण्यात आला आहे.