बुलढाण्यात शुक्रवारी शिवसेनेचा मेळावा;विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे करणार शिवसैनिकांना मार्गदर्शन!

235

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे; जालींधर बुधवत यांचे आवाहन
बुलडाणा(BNU न्यूज)- शुक्रवारी बुलढाण्यात शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत व वसंतराव भोजने यांच्यावतीने करण्यात आले आहे.

शिवसेना ही सत्तेसाठी नव्हे तर समाजासाठी आहे. जिल्ह्यात अधिक जोमाने शिवसेना संघटन मजबूत करण्यासह येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना उभारी मिळावी या दृष्टिकोनातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे शुक्रवार १६ सप्टेंबर रोजी गर्दे सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजीत करण्यात आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, भास्करराव मोरे, छगनराव मेहेत्रे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या सत्कार सोहळा व मेळाव्यासाठी शिवसेना अंगीकृत संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित आवाहन करण्यात आले आहे.

  • शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर जबाबदारी सोपवली असून या निमित्ताने बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मागील शिवसेनेच्या मेळाव्यात मोठा राडा झाला होता, आता या कार्यक्रमात राडा होईल की, शांततेत पार पडेल, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.